अहिल्यानगर राळेगणसिद्धी : काँग्रेसचे नेत्या सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा उल्लेख केला असून, अण्णा हजारे यांनी दिल्लीत केलेल्या आंदोलनाला आरएसएस () आणि भाजपचा () छुपा पाठिंबा होता. असा आरोप त्यांनी केला आहे. सोबतच अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे आमचं सरकार गेल्याचं देखील त्यांनी म्हटले आहे. यावर आता जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिउत्तर देत काँग्रेसचे नेत्या सोनिया गांधी यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे. ङ्गङ्घजबाबदार व्यक्तीने जबाबदारीनेच बोललं पाहिजे, अन्यथा स्वतःची किंमत कमी होते, असा टोला अण्णा हजारे यांनी लगावला आहे.
माझा कोणत्याही पक्षासोबत अथवा पार्टीसोबत संबंध नाही. मी जे काही करतो, ते देशहितासाठी, समाजाच्या हितासाठी करतो. असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. सोनिया गांधी यांच्या बिलाँगिंग ए जर्नी ऑफ लव्ह या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन झालं. हे पुस्तक देशभरात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलंय. सोनिया गांधींनी या पुस्तकात आणीबाणीवरही दावे केले आहेत. आणीबाणी लावण्यावरून इंदिरा गांधींवर नेहमीच टीका होते. मात्र, या पुस्तकातून सोनियांनी इंदिरा गांधींची पाठराखण करण्याचा प्रयत्न केलाय. आणीबाणी लागू करण्याचा इंदिरा गांधींचा विचार नव्हता, असा दावा सोनिया गांधींनी बिलॉग्निंग ए जर्नी ऑफ लव्ह या पुस्तकातून केलाय. आणीबाणी लागू करण्याबाबत त्यांच्या मनात संभ्रम होता. राजीव गांधीही आणीबाणीच्या विरोधात होते. मात्र संजय गांधी हे आणीबाणी लावण्याच्या समर्थनात होते असं त्यांनी म्हटलंय. तर यावेळी त्यांनी अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा उल्लेख करत अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे आमचं सरकार गेल्याचं देखील त्यांनी म्हटले आहे.
अण्णा हजारे यांना पुढे करून देशात अराजकता माजवणे हा कट होता
दरम्यान याच मुद्दयांवर बोट ठेवत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी देखील भाष्य करत भाजपवर टीका केली आहे. अण्णा हजारे यांना पुढे करून देशात अराजकता माजवणे हा कट होता. अण्णा हजारे यांनी नंतर कोणत्याच मुद्द्यावर बोलले नाही, त्यामुळे त्यांच्याकडून कोणीतरी बोलावून घेतले, हा प्रश्न आहे. कंगना राणावत तिच्यावर काय बोलायचं, ती भाजप पक्षाने भाट म्हणून ठेवली आहे. त्याच्याविषयी बोलताना चुकीचे शब्द येऊ शकतात. सामाजिक काम न करणार्या व्यक्तीला आणून बसवले. असेही शिवसेनेचे नेते अंबादास दानवे म्हणाले.